Thursday, October 20, 2011

nashibapeksha jaast..

आजही आठवतंय ......
तुझ पहिलं वहिल  पाऊल जेव्हा पडल माझ्या घरात
पोह्याचं छोट ताट ,अन दुध कमी एक कप चहात
३ तासांच्या लोड शेडींग मध्ये डोळाभरून साठवलं तुला
बोलायचे राहून गेलं काहीतरी ,फार उशिरा कळलं मला

आजही आठवतंय ......

शंका नसतानाहि मध्यरात्री केलेला फोन 
अन झोपेतच तू म्हणाला कोण बोलताय कोण?
तुझा प्रत्येक शब्द उत्तर असायचे माझं
किती राहशील दूर किती आठवांचे ओझं

आजही आठवतंय ......

तू हसता हसता काहीतरी बोलून गेलास
अन जगण्यासाठी आयुष्यागान देऊन गेलास

आजही आठवतंय ......

लाडामध्ये   एकदा बरेच काही बोलले
का कुणास ठाऊक तुझ्या मनाला ते रुतले  
तुझ्या त्या रागात प्राजक्त झले मी
जगण्याच्याच अर्थाला मुकले मी

आजही आठवतंय ......

माझा हट्ट तुला पुन्हा पुन्हा भेटण्याचा
"खूप खूप चुकले माझे" ,रेटण्याचा

आजही आठवतंय ......

समजूत कधी तू दिलीच नाही
शब्दाविना कळले मला सर्वकाही
तुझा अबोला खूप मोठ शल्य होत
माहित नाही माझ्या प्रीतीला काही मूल्य होत??

आजही आठवतंय ......

चांदण्यांकडे मागायचे तुला
पापण्यांकडे मागायचे तुला
"नशिबाबाहेरचे मिळत नाही काही "ते सांगायचे मला

आजही आठवतंय ......

तुझ्या प्रत्येक शब्दाला आठवायचे  मी
शब्दांमध्ये सूर जुळवायचे मी
पण तुटलेल्या माळेसारखे गीत कसे तुटले
तुझ्या माझ्यामध्ये सांग आता काय उरले

आजही आठवतंय ......

तुझी पाहिलेली आतुरतेने वाट
ध्यानी मनी तुझ्या स्वप्नांचा थाट
तुझ्या आयुष्याच्या वाटेवर नाही मिळणार
माझ्या आयुष्याला वाट

आजही आठवतंय ......

तुला विसरण्याचा केलेला खटाटोप
स्वताने स्वतावर केलेले आरोप
सरते शेवटी डोळ्यावर पाणी ओढून घेतले
तू नाही आयुष्यात माझ्या
जणू कुणी माझ्यातले "मीपण " काढून घेतले 
                                    :अनामिका

Friday, September 2, 2011

मजेशीर प्रश्नाची मजेशीर उत्तरे

lab असो क्लास असो ,आम्ही केलेली मज्जा ,गमतीजमती ह्या एकदम  ढिंच्याक
होत्या.आणि त्या गम्तीवर केलेल्या comments तर आभाळाला भिडणाऱ्या होत्या
.
सर्वात जास्त आणि उत्तोमोत्तम PJ  करण्याचा रेकॉर्ड सोनाली आणि VJ यांनी
मोडला..(त्यात senior सोनल चा पण महत्त्वाचा वाटा आहे)

आम्ही ३० जण जेव्हा एकत्र येत असू ,तेव्हा धमाल रंगून जात होती .मग त्या
ट्रिप्स असो (ज्यात आमचे दोन्ही CR जाम वैतागून जात ),दुपारचे जेवण
असो,आमच्यापैकीच कुणीतरी घेतलेले lecture असो ,सेमिनार असो आणि बरेच काही
.........
प्रत्याकाला खूप सारे प्रश्न पडायचे आणि त्याची ३० मजेशीर उत्तरे मिळायची..
अशीच एक प्रश्नावली ??????????????
जेव्हा SVS madam आम्हाला प्रोटीन structure शिकवायच्या तेवा सांगायच्या
कि अजून हि प्रोटीन फोल्डिंग चा pathway कुणालाच कळलेला नाही
...........मग त्या lecture नंतर मंदार चे माझ्यासाठी चे lecture
असायचे कि ह्या lectureमधून काय समजलेतेवा अशाच एका प्रसंगी त्याने मला
विचारले कि वडा,तुला माहित आहे,अजून पर्यंत प्रोटीन कसे फोल्ड होतात हे
का कळले नाही ??? मी विचारले का???  तेवा त्याने उत्तर दिले कि सर्व
प्रोटीन हे रात्रीचे फोल्ड होतात सर्व झोपल्यावर ........:):):):)


सगळ्यात जास्त मज्जा केली असेल ती फक्त होस्टेल वाल्यानीच !!!!!!!!! 
आम्ही संध्याकाळ झाल्यावर   शिवाजी  पार्क मध्ये जात असू...तिथे मग भुताच्या गोष्टी,निनाद चे पाणचट वाक्य आणि त्यांना समजून घेण्याचा मी केलेला अट्टाहास !!!!!!(मला खरच प्रश्न पडला होता कि centre च्या पाठी जी टेकडी आहे ती GNR आहे कि काय कारण तिचे नामकरण निनाद ने केले होते )
जितेश ने सांगितलेली ती driver ची गोष्ट( आपोआप चालणारी कार :):):)) आणि विजय चे ते नाक चश्म्यापर्यंत नेऊन हसणे ....आणि वंदनाच्या मुखातून पडणारे  बहुमोल शब्द ज्यांचा विजय ने शब्दकोश बनवण्याचा हट्ट धरला होता
मग यमिरा चा समजूतदारपणा (मी खरच मोठी आहे :):):):) )  आणि मला माझ्या शंका चे निरसन करून देणारी शोनाली <( ' ! ' )> हा होता आमचा होस्टेल चा चमू
असाच एक प्रसंग ....
एकदा आम्ही पार्क च्या कट्ट्यावर बसलो होतो .तिथे खूप कुत्री होती ...आम्ही त्यांच्या life विषयी बोलत होतो ......कसे जगतात न ...अभ्यास नाही .....presentation नाही (त्यावेळी १स्त presentation होते )...रोज लवकर उठून dept ला जा असेही नाही...तितक्यात निनाद चा टोला ,"और रोजरोज का नहाना' भी नही!!!!!!"......मग निनाद त्यांच्या इथल्या एका कुत्र्याची गोष्ट सांगू लागला ..."आमच्या शेजारी एक कुत्रा राहायचा (पाळलेला ???)  त्याचा मालक रोज त्याला (???km) पळवून आणायचा आणि  तो खूप थकायचा..तो कुत्रा रोज त्या मालकाला शिव्या द्यायायचा (निनाद ला माहित ) ..मग अंघोळ घालायचा त्या कुत्र्याचे तोंड वेडेवाकडे होत असायचे 'क्या यार रोजरोज का नहाना' आणि नंतर brush पण करायला सांगायचा ... " आता मात्र अति चौकस विजय ला राहवले नाही आणि त्याने निन ला प्रश्न विचारलाच "अबे वो brush तो करता था लेकीन थुकता केसे था????" त्यावर आमच्या निनाद चे उत्तर "वो कहता था  थुक!  और वो थुकता था " :-P 



मला मिअलेले एका प्रश्नाचे उत्तर ....विजय कडून
मी :अरे यार विजय ये biomarker क्या होता हे ???
vj :bio कि बुक पे मार्क करणे के लिये जो पेन होता हे उसे कहते हे biomarker


आम्ही एकदा समोर च्या बागेत जेवायला बसलो होतो ...तेवा सिद्धी ने जो डबा
आणला होता त्यातून खूप तेल बाहेर निघाले ....
ती जेवत होती आणि बोलत हि होती कि आता काय करू ...माझ्या bag ला लागेल हे
तेल .....तेव्हा तिचा एक मित्र (आमचा पण ) म्हणाला उलटी कर ....तेही ३ दा
....तेव्हा ती म्हणाली मी जेवतेय ...असे बोलू नकोस ...मग तो म्हणाला  अग
पिशवी उलटी  कर ....:-):-)

एकदा अक्षय HMM शिकवत होता ...तेव्हा  माझे आणि सुमित चे लक्ष नव्हते
...तो शिकवत होता आणि मध्ये सुमित ने मला प्रश्न विचारला कि हा s आणि e
काय आहे   ??? मी म्हणाले s for सुमित आणि e for (*****)  ..मी म्हणाले
शक्य नाही...मग तो म्हणाला अग पहिले अक्षर silent ग ..

Tuesday, May 31, 2011

सोनेरी अनुभव: काही अशाही आठवणी :):):)

सोनेरी अनुभव: काही अशाही आठवणी :):):): "या पुण्याने आणि bioinfo ने मला खूप काही दिले आहे.काही प्रसंग तर असे आहेत की कधीही डोळ्यासमोर आले तर ताजेतवानेच वाटतात.अजून हि त्या थट्टा..."

काही अशाही आठवणी :):):)

या पुण्याने  आणि bioinfo ने  मला खूप काही दिले आहे.काही प्रसंग  तर असे आहेत की कधीही  डोळ्यासमोर आले तर ताजेतवानेच वाटतात.अजून हि त्या थट्टा मस्करी,तो राग,.चीडचीडेपणा ,छोटे छोटे वाद ,(ज्यांना वारंवार मीच कारणीभूत असायचे )आठवले तर असे वाटत्ते की का ते दिवस कापूर वडीसारखे  झटकन उडून गेले ?त्यात होस्टेलची मज्जा तर विचारता सोय नाही.त्या साऱ्या nightouts आणि  खूप खूप गप्प्पामधे रंगलेल्या त्या रात्री.भुताच्या गोष्टी ज्यामध्ये कधी भीती तर वाटली नाही पण भुताची उडवलेली खिल्ली,त्या साऱ्या ट्रिप्स ज्यामध्ये एक कुणीतरी, कुणाचे तरी special   नेहमीच absent असायचे. आणि त्याच्या त्या अनुपस्थितीवर केलेली टिंगल ! मिस वंदनाने सर्वाना दिलेल्या त्या लाखमोलाच्या पदव्या (बाग्डिया,डंगर अजून खूप काही ज्याचा विजय शब्दकोश बनवणार होता ).रेंजूची शिकवण ,मंदारच्या टवाळ्या,प्रीतीचे रोखठोक बोलणे ,NCCS चा चहा(शेखरचे पांचट विनोद ,पूजाचा प्रोजेक्ट आणि अश्विनीच्या लग्नाच्या गोष्टी etc)  असेच मला खूप सारे प्रसंग खूप सारे अनुभव इथे मांडावेसे वाटतात .या मध्ये एक अनुभव असा आहे की तो कितीही चघळला तरी तो boring वाटत नाही .तो असा ................................





आम्ही first year मध्ये असताना आम्हाला पुढील वर्षासाठी होस्टेल allotment सुरु होते,आधी मुलांचे झाले मग मुलींचे होते,माझा lucky draw आधी लागला म्हणून मी रांगेत उभी होते,तेवा तिथे मला छोट्या कट्ट्यावर यतीश चा  passport size फोटो दिसला ,आणि मी थोडीशी गोंधळले आणि विचार केला अरे हा यतीश च आहे ना ,हं ! विचार केला की हा पण इथे allotment  साठी आला असेल तेव्हा  इथे पडला असेल,मी तो फोटो उचलला आणि माझ्या पाकिटात ठेवला, चला तर मी म्हणले की उद्या याला क्लासमध्ये देऊ.पण bioinfo मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे (कारण ते 2nd semester होते तर तुम्हाला माहित असेल की workload काय होता P) माझ्या लक्षात राहिले नाही.किती वेळा सोबत आम्ही चहा प्यायला असेल तरी कधी माझ्या लक्षात आले नाही,आणि एकदा असेच काही कारणानिमित्त मी घरी गेले.

सकाळी ७.३० ची बस होती मी ११.३० च्या सुमारास संगमनेरमध्ये पाऊल टाकले जेवा मी संगमनेरला जाते तेवा पटकन सर्व  सामान  ठेऊन मी पहिल्यांदा मैत्रिणीकडे जाते त्याही दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी न जाता direct college  वर   गेले.मग काय गप्प्पाच गप्पा पुण्याच्या ,संगमनेरच्या गमतीजमती,वेळ कसा गेला कळलेच नाही,संध्याकाळी ७ च्या दरम्यान मी घरी आले,तोपर्यंत आईने माझे कपडे आणि bag धुवून वाळत घातले होते,आणि मी पुन्हा बडबडायला सुरवात केली .मी अनुशी बोलत होते,तिची शाळा माझे deptartment ,शिक्षक,आमचे रुपवते नगर ,तिथल्या घडामोडी  आणि मी खूप हसत होते आणि तीही खूप हसत होती,पण तिला मला काहीतरी बोलयाचे होते,पण mummy घरात असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती  असे वाटत होते,आणि ती हळूच म्हणाली ताई  choice चांगली नाही .

मला क्षणभर काहीच कळले नाही,मी तिला पुन्हा पुन्हा विचारात होते पण ती कार्टी फक्त  हसत होती.मग ती माझ्याकडे माझे पाकीट घेऊन आली आणि मला लगेच click झाले ,की ती गोष्ट काय होती. अरे देवा एवढा मोठा पेच प्रसंग कसा सोडवायचा?ती माझ्याकडे पाहून हसत होती,आणि तितक्यात आई चहा घेऊन आली .मी पटकन बोलले" mummy ,  असे काही नाहीये अग त्या दिवशी ना ...... ..आईने मला थांबवले आणि हसत बोलली "मी तुला काही बोलले का?आताच आली आहे न जा हातपाय धु आणि हा चहा घे!",मला कुणीही काही बोलणार नव्हते  पण त्यावेळी मी कोड्यात पडले होते ,साहजिकच आहे,मुलीला पुण्यात सोडले आणि ...........मला कल्पना हि करवत नव्हती   की आई काय विचार करत असेल.पण मला माहित होते  माझा प्रामाणिक पण फक्त आईलाच ठाऊक!

मी चहा घेतात घेता घडलेला प्रसंग वर्णन केला.आणि हि अन्नू कार्टी चहा पिता पिता हसत होती .आणि मग रात्री ओट्यावर बसून गप्पा मारत अस्ताताना विचारले ती पुण्यात settle व्यायचे की मुंबईला ??आता मला lifetime  साठी   हे चिडवणे राहणार होते.आणि मी काहीच करू शकणार नवते.बिचारा निरागस यतीश आणि त्याच्या वाट्याला आलेले  हे सर्व! आणि मला माहित होते की जर मी क्लासमध्ये हा प्रसंग सांगितला  तर सर्व जण जाम हसणार आहेत .मलाही हसू आवरत नव्हते.मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुण्याकडे निघाले.माझ्या वेन्धले पणामुळे  आईने सांगितले की थोडेच पैसे वर ठेव, बाकीचे आत पुस्तकात ठेव.मी तिकीट काढले आणि उरलेले पेसे पाकिटात ठेवले.त्यासोबत ५००चि नोट हि  होती.मी सकाळ ६.३० ची बस पकडली
आणि मी झोपून घेतले.ते पाकीट काही मी आत ठेवले नाही.माझी बस २-३ ठिकाणी थांबली पण मला काही जाग आली नाही 
११ च्या सुमारास मी पुण्यात आले शिवाजीनगरच्या busstand  कडे  आले बस आली बसमध्ये चढले आणि अचानक लक्षात आले अरे आपले पाकीट ??मी conductor  la सांगितेल की बस मधेच विसरले,आता ५०० आहेत सुट्टे नाहीत.तो म्हणाला उतरं इथेच, जा बघ असेल तिथेच.पण ती बस direct शिवाजी नगरची nawhati मागे जाण्यात काही अर्थ नव्हता  मी म्हणाले  जाऊ द्या.मला त्याने  फुकटात university  पर्यंत  सोडले .त्या पाकिटात बिचाऱ्या पाटीलचा फोटो तर गेलाच पण माझा होस्टेल चा id हि गेला मला अजूनही हसू आवरत नव्हते  .मी हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही.असा हा भोळा पाटील !!!!  :P:P:P

Monday, May 30, 2011

ज्ञान ही संपत्ती आहे पण अनुभव ही हातातील रोख रक्कम आहे असे कुणी थोर माणसाने लिहून ठेवलंय,पण मी वेळोवेळी ते अनुभवलंय,अगदी चिमुरड्या वयापासून ते आतापर्यंत ! माहित आहे की सर्व गोष्टी आपण वाटून घेऊ शकतो पण हे अनुभव अशी गोष्ट आहे की कितीही सांगा तिची मजा  अनुभव घेणाऱ्यालाच ठाऊक ! कधी कटू कधी गोड ,आठवणीतले अनुभव ! अजूनही आठवताना थोडेसं कधी खटकत ,कधी हसू उमटत.आणि जर ते अनुभव "त्या " खास व्यक्तींच्या सहवासाने सजले असतील तर ते बनून जातात "सोनेरी अनुभव" मग ते गोड असोत वा कटू असोत,मनात घर केल्याशिवाय राहत नाहीत.असेच काही क्षण मी इथे या ब्लॉगच्या स्वरुपात व्यक्त करत आहे.तुमच्या प्रतिक्रियांना ही तेवढच महत्त्व आहे बर....