या पुण्याने आणि bioinfo ने मला खूप काही दिले आहे.काही प्रसंग तर असे आहेत की कधीही डोळ्यासमोर आले तर ताजेतवानेच वाटतात.अजून हि त्या थट्टा मस्करी,तो राग,.चीडचीडेपणा ,छोटे छोटे वाद ,(ज्यांना वारंवार मीच कारणीभूत असायचे )आठवले तर असे वाटत्ते की का ते दिवस कापूर वडीसारखे झटकन उडून गेले ?त्यात होस्टेलची मज्जा तर विचारता सोय नाही.त्या साऱ्या nightouts आणि खूप खूप गप्प्पामधे रंगलेल्या त्या रात्री.भुताच्या गोष्टी ज्यामध्ये कधी भीती तर वाटली नाही पण भुताची उडवलेली खिल्ली,त्या साऱ्या ट्रिप्स ज्यामध्ये एक कुणीतरी, कुणाचे तरी special नेहमीच absent असायचे. आणि त्याच्या त्या अनुपस्थितीवर केलेली टिंगल ! मिस वंदनाने सर्वाना दिलेल्या त्या लाखमोलाच्या पदव्या (बाग्डिया,डंगर अजून खूप काही ज्याचा विजय शब्दकोश बनवणार होता ).रेंजूची शिकवण ,मंदारच्या टवाळ्या,प्रीतीचे रोखठोक बोलणे ,NCCS चा चहा(शेखरचे पांचट विनोद ,पूजाचा प्रोजेक्ट आणि अश्विनीच्या लग्नाच्या गोष्टी etc) असेच मला खूप सारे प्रसंग खूप सारे अनुभव इथे मांडावेसे वाटतात .या मध्ये एक अनुभव असा आहे की तो कितीही चघळला तरी तो boring वाटत नाही .तो असा ................................
आम्ही first year मध्ये असताना आम्हाला पुढील वर्षासाठी होस्टेल allotment सुरु होते,आधी मुलांचे झाले मग मुलींचे होते,माझा lucky draw आधी लागला म्हणून मी रांगेत उभी होते,तेवा तिथे मला छोट्या कट्ट्यावर यतीश चा passport size फोटो दिसला ,आणि मी थोडीशी गोंधळले आणि विचार केला अरे हा यतीश च आहे ना ,हं ! विचार केला की हा पण इथे allotment साठी आला असेल तेव्हा इथे पडला असेल,मी तो फोटो उचलला आणि माझ्या पाकिटात ठेवला, चला तर मी म्हणले की उद्या याला क्लासमध्ये देऊ.पण bioinfo मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे (कारण ते 2nd semester होते तर तुम्हाला माहित असेल की workload काय होता P) माझ्या लक्षात राहिले नाही.किती वेळा सोबत आम्ही चहा प्यायला असेल तरी कधी माझ्या लक्षात आले नाही,आणि एकदा असेच काही कारणानिमित्त मी घरी गेले.
सकाळी ७.३० ची बस होती मी ११.३० च्या सुमारास संगमनेरमध्ये पाऊल टाकले जेवा मी संगमनेरला जाते तेवा पटकन सर्व सामान ठेऊन मी पहिल्यांदा मैत्रिणीकडे जाते त्याही दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी न जाता direct college वर गेले.मग काय गप्प्पाच गप्पा पुण्याच्या ,संगमनेरच्या गमतीजमती,वेळ कसा गेला कळलेच नाही,संध्याकाळी ७ च्या दरम्यान मी घरी आले,तोपर्यंत आईने माझे कपडे आणि bag धुवून वाळत घातले होते,आणि मी पुन्हा बडबडायला सुरवात केली .मी अनुशी बोलत होते,तिची शाळा माझे deptartment ,शिक्षक,आमचे रुपवते नगर ,तिथल्या घडामोडी आणि मी खूप हसत होते आणि तीही खूप हसत होती,पण तिला मला काहीतरी बोलयाचे होते,पण mummy घरात असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती असे वाटत होते,आणि ती हळूच म्हणाली ताई choice चांगली नाही .
मला क्षणभर काहीच कळले नाही,मी तिला पुन्हा पुन्हा विचारात होते पण ती कार्टी फक्त हसत होती.मग ती माझ्याकडे माझे पाकीट घेऊन आली आणि मला लगेच click झाले ,की ती गोष्ट काय होती. अरे देवा एवढा मोठा पेच प्रसंग कसा सोडवायचा?ती माझ्याकडे पाहून हसत होती,आणि तितक्यात आई चहा घेऊन आली .मी पटकन बोलले" mummy , असे काही नाहीये अग त्या दिवशी ना ...... ..आईने मला थांबवले आणि हसत बोलली "मी तुला काही बोलले का?आताच आली आहे न जा हातपाय धु आणि हा चहा घे!",मला कुणीही काही बोलणार नव्हते पण त्यावेळी मी कोड्यात पडले होते ,साहजिकच आहे,मुलीला पुण्यात सोडले आणि ...........मला कल्पना हि करवत नव्हती की आई काय विचार करत असेल.पण मला माहित होते माझा प्रामाणिक पण फक्त आईलाच ठाऊक!
मी चहा घेतात घेता घडलेला प्रसंग वर्णन केला.आणि हि अन्नू कार्टी चहा पिता पिता हसत होती .आणि मग रात्री ओट्यावर बसून गप्पा मारत अस्ताताना विचारले ती पुण्यात settle व्यायचे की मुंबईला ??आता मला lifetime साठी हे चिडवणे राहणार होते.आणि मी काहीच करू शकणार नवते.बिचारा निरागस यतीश आणि त्याच्या वाट्याला आलेले हे सर्व! आणि मला माहित होते की जर मी क्लासमध्ये हा प्रसंग सांगितला तर सर्व जण जाम हसणार आहेत .मलाही हसू आवरत नव्हते.मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुण्याकडे निघाले.माझ्या वेन्धले पणामुळे आईने सांगितले की थोडेच पैसे वर ठेव, बाकीचे आत पुस्तकात ठेव.मी तिकीट काढले आणि उरलेले पेसे पाकिटात ठेवले.त्यासोबत ५००चि नोट हि होती.मी सकाळ ६.३० ची बस पकडली
आणि मी झोपून घेतले.ते पाकीट काही मी आत ठेवले नाही.माझी बस २-३ ठिकाणी थांबली पण मला काही जाग आली नाही
११ च्या सुमारास मी पुण्यात आले शिवाजीनगरच्या busstand कडे आले बस आली बसमध्ये चढले आणि अचानक लक्षात आले अरे आपले पाकीट ??मी conductor la सांगितेल की बस मधेच विसरले,आता ५०० आहेत सुट्टे नाहीत.तो म्हणाला उतरं इथेच, जा बघ असेल तिथेच.पण ती बस direct शिवाजी नगरची nawhati मागे जाण्यात काही अर्थ नव्हता मी म्हणाले जाऊ द्या.मला त्याने फुकटात university पर्यंत सोडले .त्या पाकिटात बिचाऱ्या पाटीलचा फोटो तर गेलाच पण माझा होस्टेल चा id हि गेला मला अजूनही हसू आवरत नव्हते .मी हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही.असा हा भोळा पाटील !!!! :P:P:P
So what? Pune or Mumbai :)
ReplyDeleteNice one !!
Ha Ha Ha... Gr8.. Amhala kadhich nahi sangitles he...:)
ReplyDeleteEk number...
Varnan kelela.....prasanga ha keval yogayog samjava......
ReplyDeleteyatish yogayog??? :(:(
ReplyDeletesir,it depends ...........
ReplyDelete